यावल : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता माघारी नंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी यामध्ये यावल तालुक्यातुन चार अर्ज शिल्लक असतांना एका माजी संचालकाने माघार घेतली आहे तर आता तालुक्यात तिरंगी लढतीचे चित्र दिसत आहे.यात आर. जी. पाटील, विनोदकुमार देशमुख व प्रशांत चौधरी असे उमेदवार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माघारीनंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे यामध्ये यावल तालुक्यात एका जागेसाठी तिरंगी लढत होत आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष भाजपाचे आर.जी.पाटील, काँग्रेसचे माजी संचालक विनोदकुमार देशमुख व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत चौधरी हे रिंगणात आहे. दरम्यान यावल तालुक्यातील ही तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीत सद्या सक्रीय असलेल्या आर.जी. पाटील यांनी आपण भाजपाचे असुन पक्षासाठीचं काम करणार असा दावा केला आहे मात्र, भाजपा महायुतीकडून विनोदकुमार देशमुखांचे नाव पुढे आहे तेव्हा अशात नेमके भारतीय जनता पार्टी कडून उमेदवार कोण असा संभ्रम मतदारांमध्ये आहे. तेव्हा या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याच्या लक्ष लागले आहे.
तांत्रिक अडचणीमुळे राहिला अर्ज,
माजी संचालक गणेश नेहेते यांनी सांगितले की पक्षश्रेष्ठींनी आपल्याला माघार घेण्याच्या सांगितले होते. दरम्यान वेळ निघून गेली होती म्हणून माझा अर्ज राहिलेला आहे. मी निष्ठावान कार्यकर्ता आहे व मला संधी मिळायला हवी होती मात्र पक्षश्रेष्ठींनी दिलेले आदेश पाळणार असुन मी जाहीर माघार घेत आले. तत्पूर्वी पक्षाकडून अजूनही आपणास संधी मिळेल अशी अपेक्षा बाळगून आपण आपला पुढील निर्णय घेणार आहोत असे त्यांनी सांगितले.
मी भाजपाचाच.
दरम्यान जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर. जी. नाना पाटील यांनी देखील स्पष्ट केले आहे की, मी भारतीय जनता पार्टी सोबत आहे. माझी उमेदवारी देखील मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करीत आहे व जरी आपण या निवडणुकीत विजयी झालो तरी सुद्धा आपण भाजपाच्या सोबतच राहणार आहोत असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे
Tags
राजकिय
