मतदारांच्या आग्रहाखातर माझी उमेदवारी, माघारीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : आर. जी. नाना पाटील.


 

 यावल  : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता आपली उमेदवारी ही यावल तालुक्याच्या मतदारांच्या आग्रहा खातरच असून मी माघार घेतलेली नाहीये, आणि यापुढे देखील माघार घेणार नाहीये, तेव्हा माझ्या माघारी संदर्भात जर कोणी सांगत असेल तर त्या अफवा आहेत. आणी मतदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन जिल्हा बँकेच्या मतदारांना अपक्ष उमेदवार आर.जी.नाना पाटील यांनी केले आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावल तालुक्यातून अपक्ष उमेदवार आर.जी. नाना पाटील यांनी जिल्हा बँकेत आपण करत असलेली उमेदवारी ही यावल तालुक्याच्या मतदाराच्या आग्रहाखातर करीत आहोत, आपण भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय काम करत असून यापुढे देखील आपण भारतीय जनता पार्टीतच सक्रिय राहणार आहोत. दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मी माघार घेतली आहेे, याबाबत काही अफवा देखील पसरल्या जात आहेत. तेव्हा यावल तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आपण प्रचार सुरू केलेला आहे. मतदारांच्या सतत संपर्कात आहोत व मतदारांच्या आग्रहाखातरच आपण उमेदवारी करत असल्याचे स्पष्टीकरण आर. जी. नाना पाटील यांनी दिले आहे. दरम्यान आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता असून निवडणूक झाल्यानंतरही आपण भारतीय जनता पार्टीतच राहणार आहोत. तेव्हा माझ्याबद्दल तसेच मी उमेदवारी मागे घेतली आहे असे जर कोणी म्हणत असेल तर ती अफवा आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवणार.
आपण यावल तालुक्यातील मतदारांच्या आग्रहास्तव उमेदवारी करत आहोत. जर आपण माघार घेतली तर माझ्यावरील मतदारांचा विश्वास उठून जाईल. तेव्हा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे काही मतदार आहेत त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठीच उमेदवारी करत असल्याचे आर. जी. नाना पाटील यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने